Mahila Shetkari Pramanpatra 2026: महाराष्ट्र सरकारने एक महिन्यापूर्वीच खास महिलांसाठी एक योजना आणलेली आहे आणि या योजनेचे नाव म्हणजेच महिला शेतकरी प्रमाणपत्र होय. महाराष्ट्रातील कोणतीही महिला शेतकरी प्रमाणपत्र काढू शकती. असंच नाही की ज्या महिन्याच्या नावावर जमीन आहे त्याच हे सर्टिफिकेट काढू शकतात.
ज्यांच्या नावावर जमीन नाही ते पण हे सर्टिफिकेट काढू शकतात आणि यामध्येच सरकारने घोषणा केली आहे की आता लवकरच महिला शेतकरी प्रमाणपत्र बंद करण्यात येणार आहे. जर तुम्ही अजूनही वुमन फार्मर सर्टिफिकेट काढलं नसेल तर या लेखामध्ये तुम्हाला आम्ही पात्रता कागदपत्रे आणि प्रमाणपत्र कसे काढायचे हे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे तरी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल.
काय आहे महिला शेतकरी प्रमाणपत्र?
ज्या महिलांना व तसेच पुरुषांना सांगू इच्छितो की जर तुमच्या मनात सुद्धा महिला शेतकरी प्रमाणपत्र (Women Farmer Certificate) काय आहे हा प्रश्न आला असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीच्या कामात खूप मोठ्या पद्धतीने महिला काम करत असतात व त्यांचा खूप मोठा सहभाग व तसेच योगदान असते.
पण महिला काम करत असताना त्या शेतकरी आहे अथवा नाही हे अधिकारीक कोणालाच माहित नसते. म्हणून महाराष्ट्र सरकारने महिलांना त्यांची अधिकृत वळक मिळावी म्हणून महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना राबवण्यात आली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की सर्टिफिकेट काढणं अगदी सोपे आहे व त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला खालीलपैकी दिलेली आहे.
Mahila Shetkari Certificate काढण्यासाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात?
मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल की महिलांना शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती पात्रता पाहिजेत तर तुम्हाला मी खालील प्रमाणे व्यवस्थित सांगितलेली आहे.
अधिकृत वेबसाईट अनुसार मी तुम्हाला प्रमाणपत्र काढण्यासाठी कोण कोणती पात्रता लागत असते हे सांगणार आहे. तर सर्वप्रथम महिला अर्जदार महाराष्ट्र मधील रहिवासी असणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त महिलांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त असले तरी चालते.
जर महिलांकडे शेती असेल तरीसुद्धा त्या या योजना चा लाभ घेऊ शकता व तसेच ज्या महिलांकडे शेती नाही आणि त्या शेतामध्ये काम करत असेल म्हणजेच मजूर म्हणून सुद्धा काम करत असेल तर त्या महिला सुद्धा शेतकरी प्रमाणपत्र काढू शकते.
महिला जवळ आधार कार्ड व आधार कार्ड ला संबंधित मोबाईल क्रमांक असला पाहिजे व त्याचबरोबर आवश्यक रहिवासी कागदपत्रे लागतात.
काय आहे या प्रमाणपत्राचा उपयोग?
जर तुम्हाला या प्रमाणपत्राचा उपयोग काय आहे हे माहीत नसेल तर मी तुम्हाला खालील प्रमाणे सांगितलेले आहे. मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्र मध्ये जेवढ्या कृषी योजना आहे त्यांचा लाभ घेऊ शकतात. याचबरोबर कृषी कर्ज सुद्धा महिला या प्रमाणपत्राच्या माध्यमातून देऊ शकते.
इतकेच नाही पिक विमा संबंधित सर्व सेवांमध्ये हे प्रमाणपत्र खूप उपयोगी ठरू शकते. विविध सरकारी कृषी योजना व तसेच सेवा महिला शेतकऱ्यांची अधिकृत नोंद महत्त्वाची ठरवून त्यांना अनुदान मिळू शकते.
नोंदणीची शेवटची तारीख?
अधिकृत माहितीच्या अनुसार मी तुम्हाला सांगतो की सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत महिला शेतकरी प्रमाणपत्र काढता येणार आहे. म्हणून ज्या महिला या योजनेपासून वंचित आहे त्यांनी लवकरात लवकर मोबाईलच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र काढून घ्यावे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत महा कृषी महिला शेतकरी पोर्टलला भेट द्यायची आहे.
- अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अप्लाय नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला जी जी माहिती असेल ती भरायची आहे जसे की आधार क्रमांक पूर्ण नाव जिल्हा तालुका व गावाचे नाव असे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे व नंतर ओटीपी पाठवायचा आहे.
- ओटीपी पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही कोणती काम करतात ते सिलेक्ट करायचे आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एकनॉलेजमेंट म्हणजेच अर्ज क्रमांक मिळेल.
- अर्ज क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या मेसेजवर सुद्धा येऊन जातो.
- जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर पोर्टलवर जाऊन अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महिला शेतकरी प्रमाणपत्र काढून घेऊ शकता.
Disclaimer: वरील सांगितलेली माहिती आम्ही तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून सांगितली आहे. तरी तुम्ही अर्ज करण्या अगोदर पडताळणी करून घ्यावी.